Farmingसेंद्रिय शेती

Natural Farming Benefits: नैसर्गिक पद्धतीने शाश्‍वत शेती फायदेशीर

Chhatrapati Sambhajinagar News : भारतातील मध्यम शेतकरी संख्या लक्षात घेता नैसर्गिक पद्धतीने शाश्वत शेती करणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन इस्रायली दूतावासातील कृषी प्रतिनिधी ऊरी रॉबिन्स्टीन यांनी केले.

हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्रास सोमवारी (ता. १७) दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नैनवाड, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. विजय सावंत, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. सदाशिव अडकिने आदींची उपस्थिती होती.

या वेळी ऊरी म्हणाले, की वातावरणातील प्रदूषणाचा जमिनीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक शेती चांगला उपाय आहे. त्या शेती पद्धतीमुळे जमिनीतील उपयुक्त घटकांची वाढ होऊन सुपिकता वाढीस लागेल. यामुळे उत्पादकतेत सुधारणा होऊन पीक उत्पादनात वाढ होईल.

दरम्यान, गुणवत्ता केंद्रातील चालू असलेली तांत्रिक कामे, प्रक्षेत्रावरील स्वच्छता अन् मोकाट जनावरांचा केलेला बंदोबस्त पाहून ऊरी यांनी समाधान व्यक्त केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद नंदनवरे, मंगेश अंभोरे, शहाबाज, जहीर शेख, राजू सोनवणे, शेख अफरोज आदींनी परिश्रम घेतले.