तुपासोबत ‘या’ गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान
तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. सेलिब्रिटींपासून आहारतज्ज्ञांपर्यंत तुपाच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. तूप शरीराला ऊर्जा देते, पचन सुधारते आणि अनेक पोषक घटकांमुळे शरीराला पोषण मिळतं. मात्र, तुपाचा योग्य आणि संयमित वापर करणे गरजेचे आहे. काही पदार्थांसोबत तूप खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींसोबत तूप खाणं टाळावं.
1. तूप आणि चहा
तुपात चहा मिसळून घेणं टाळावं. तूप आणि चहा एकत्र घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे ॲसिडिटी, गॅस किंवा जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. चहा आणि तूप वेगवेगळ्या वेळेस सेवन करणे योग्य ठरते.
2. तूप आणि मध
आयुर्वेदानुसार तूप आणि मध एकत्र खाणे टाळावे. दोन्ही पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये मोठा विरोधाभास आहे. तूप आणि मध एकत्र घेतल्याने पचनसंस्थेत रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे पचनाच्या तक्रारी वाढू शकतात.
3. तूप आणि मासे
तूप आणि मासे एकत्र खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो आणि त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. याशिवाय शरीरात हानिकारक टॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मासे खाल्ल्यावर तूप टाळणं योग्य ठरते.
4. तूप आणि लिंबूवर्गीय फळं
तुपासोबत आंबट फळे खाणं टाळा. फळं शरीरात लवकर पचतात, तर तूप पचायला अधिक वेळ लागतो. या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने पचनक्रिया बिघडू शकते. गॅस, फुगणं आणि अपचनासारख्या समस्या होण्याचा धोका निर्माण होतो.
5. तूप आणि दही
तूप आणि दही एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. दोन्ही पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये विरोधाभास असल्याने ते पचनाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तूप आणि दही एकत्र खाण्याची सवय टाळावी.
आरोग्यदायी तुपाचा योग्य वापर कसा करावा?
- तूप नेहमी गरम अन्नासोबतच खावं.
- दुपारच्या वेळी तुपाचं सेवन अधिक फायदेशीर मानलं जातं.
- तूप प्रमाणात खाल्ल्यास पचन सुधारतं आणि शरीराला उष्णता मिळते.
- कोणत्याही आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुपाचा योग्य वापर करावा.
तूप हे आरोग्यासाठी अमृतासमान आहे, मात्र त्याचा अयोग्य वापर टाळणे हेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी महत्त्वाचं आहे.